सर्व पालकांचे या वेबसाईटवर हार्दिक स्वागत!!!!
या वेबसाईटवर इयत्ता पाचवी ते नववीचे सर्व शैक्षणिक साहित्य आहे. यात या इयत्तांचे सर्व विषय आहेत. शैक्षणिक साहित्य हे दोन प्रकारात विभागले आहे. प्रत्येक पाठासाठी संकल्पना व कृती दिलेल्या आहेत. संकल्पना या व्हिडीओ स्वरूपात आहेत. कृती या pdf मध्ये दिलेल्या आहेत. काही कृती वैयक्तिक आहेत, तर काही गटामध्ये करावयाच्या आहेत. कृती लिहिताना खालील मुद्द्यांचा विचार करण्याचा प्रयत्न केला आहे.
- त्या पाठात आलेली संकल्पना विद्यार्थ्याला समजली पहिले.
- विद्यार्थी/विद्यार्थिनी मिळून गटामध्ये काम करू शकले पाहिजे. यामुळे त्यांच्यामधील परस्परभावना वाढीस लागतील.
- कृती करताना शक्य तेथे तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुचवले आहे.
- पाठात शिकलेल्या संकल्पनेचा दैनंदिन जीवनात कसा वापर करू शकतो हे सुचवले आहे.
कृतीमध्ये पंचेन्द्रियांचा वापर केला आहे. कृती केल्यामुळे विद्यार्थी केवळ परीक्षेसाठी तयार न होता जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकतील या उद्देशाने हे शैक्षणिक साहित्य तयार केले आहे.
आपण सर्वांनी या साहित्याचा जास्तीत जास्त वापर करावा. आपल्या जवळच्या शाळांना, पालकांना याबद्दल सांगावे.
आपल्याला या साहित्यात काही भर घालण्याची इच्छा असल्यास, shikshan.pandhari@gmail.com या इ-मेल वर संपर्क साधावा.
आम्ही आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहोत.!
धन्यवाद!!