Param School and Param University for Quality School Education For All With Focus On Rural Area
या प्रकल्पासाठी लागणारे मोलाचे आर्थिक सहाय्य महाराष्ट्र शासनाच्याराजीव गांधी सायन्स आणि टेक्नॉलॉजी कमिशन ह्यांनी केले आहे. एमकेसील नॉलेज फाउंडेशन ह्यांनी प्रकल्पातील शैक्षणिक ह्यांनी अनेक विषयतज्ञांच्या मदतीने मुक्त ज्ञान स्त्रोतांची निर्मिती केली आहे. या प्रकल्पात पंढरपूर तालुक्यातील खाली नमूद केलेल्या शाळांनी सक्रीय सहभाग घेतला.
- श्री दर्लिंग विद्यामंदिर - चळे
- श्री सीताराम महाराज विद्यालय- खर्डी
- दौलत राव विद्यालय- कासेगाव
- रयत शिकण संस्थेचे- न्यू इंग्लिश स्कूल अनवली
खाली दिलेल्या संस्थांनी या प्रकल्पात योगदान दिले आहे.
- नॅशनल नॅालॆज नेटव॔क (National Knowledge Network) : ह्यांनी ह्याप्रकल्पासाठी कॅम्मुनिकेशेन व इंटरनेट बँडविड्थ उपलब्ध करून दिली.
- श्री विठ्ठल एज्युकेशन आणि इंजिनिअरींग रीसर्च इन्स्टिट्यूट (SVERI) : या संस्थेने नोडल एजन्सी म्हणून चे काम पाहिले.
- विज्ञान आश्रम- पाबळ : कौशल्याधारित शिक्षण उपक्रम राबवण्यासाठी व त्या संबंधी मुक्त शिक्षण स्त्रोत तयार करण्यात महत्वपूर्ण योगदान दिले.
- होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन (HBCSE) : शिक्षणाचे प्रशिक्षण व तज्ञ मार्गदर्शन ह्यात महत्वपूर्ण योगदान दिले.
- इंडियन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आय आय टी- पवई): ह्या प्रकल्पासाठी विद्यार्थी व शाळांन साठी AAKASH Tablet दिले.
भारतीय वर्गखोलीत ज्ञानरचनावादी शिक्षण कसे होईल, यासाठी विविध प्रयोग केले गेले. विद्यार्थी व शिक्षक यांनी उत्तम प्रतिसाद दिला. शिक्षणासाठी वेगवेगळ्या धोरणांचा अवलंब केला. कृतियुक्त शिक्षण, प्रकाल्पधारित शिक्षण, समस्याधारीत तसेच समस्या निराकरण करणारे शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण अशा नवनवीन पद्धती वापरून विद्यार्थी कसे आनंदाने शिकतात हे पाहण्यात आले.
- 21 व्या शतकातील विद्यार्थ्यासाठी असणारे भूमिकेवर आधारित शिक्षण
- शिकण्यासाठी शिकणे: आजीवन शिकणे
- निरंतर शिक्षण (आयुष्यापासून, आयुष्यासाठी शिकणे)
- वेगळा विचार करणारे/ नवोन्मेष आणणारे
- बदल घडवून आणणारे
- समस्या सोडवणारे
- कुतूहल असणारे
- आयसीटी कौशल्ये आत्मसात करणारे
- सामाजिक संपत्ती निर्माण करणारे हे सर्व करत असताना विविध वेबसाईट पाहण्यात आल्या. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी पाठ्याक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य विनामूल्य असणारी एकही वेबसाईट आढळली नाही. चांगल्या प्रतीचे शिक्षण सर्वदूर पोहोचवण्याच्या उद्दिष्टाने या वेबसाईटची निर्मिती केली गेली.
OER वर आधारित कोर्स या प्रकल्पात मुक्त शिक्षण स्रोत तयार केला आहे. हे शैक्षणिक स्रोत सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. हे सर्व साहित्य एस एस सी बोर्डच्या पाठ्यक्रमावर आधारित आहे. याचा वापर पालक, शिक्षक आणि विद्यार्थी सर्वजण करू शकतात. आपल्या स्वत:च्या गतीनुसार हे साहित्य पाहता येते. शिक्षण रचनावादी होण्याच्या दृष्टीने हे साहित्य दोन प्रकारात विभागले आहे. इयत्ता पाचवी ते नववीपर्यंत चे शिक्षण या नवीन पद्धतीने घेता येईल.
Concept OER Activity OER • व्हिडिओ स्वरूपात आहे. • पाठाचे संकल्पना चित्र दिले आहे. • स्पष्टीकरण सोप्या भाषेत दिले आहे. • उदाहरणे दिली आहेत. • मूल्यमापनासाठी MCQ आहेत. • शक्य तेथे मुक्तोत्तरी प्रश्न दिले आहेत. • Document स्वरूपात आहे. • एकट्याने किंवा गटाने करण्याच्या कृती दिल्या आहे. • शकत तेथे तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन दिले आहे. • समाजाशी संपर्क करण्यासाठी कृती दिल्या आहेत. • संकल्पना स्पष्ट होण्यासही कृती दिल्या आहेत. • संकल्पनेची समाजाशी जोड लावण्याचा प्रयत्न केला आहे.
विद्यार्थी, शिक्षक, तज्ज्ञ व समाज यांच्या सहकार्याने नवीन स्रोतांची सहनिर्मिती चालू ठेवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.