सर्व विद्यार्थ्यांचे या वेबसाईटवर हार्दिक स्वागत!!!

या वेबसाईटवर इयत्ता पाचवी ते नववीचे सर्व शैक्षणिक साहित्य आहे. यात या इयत्तांचे सर्व विषय आहेत. शैक्षणिक साहित्य हे दोन प्रकारात विभागले आहे. प्रत्येक पाठासाठी संकल्पना व कृती दिलेल्या आहेत. संकल्पना या व्हिडीओ स्वरूपात आहेत. कृती या pdf मध्ये दिलेल्या आहेत. काही कृती वैयक्तिक आहेत, तर काही गटामध्ये करावयाच्या आहेत.
कृती करताना तुम्ही कधी एकटे किंवा कधी गटामध्ये काम करणार आहात. गटामध्ये काम करताना एकमेकांकडून शिकण्याची व एकमेकांना मदत करण्याची वृत्ती असली पाहिजे. आपले काम उत्तम कसे होईल यावर भर दिला पाहिजे. इतरांनी हे काम कसे केले, काय बदल केल्यास अधिक चांगले व कमी वेळात होईल याचा सतत विचार केला पाहिजे. आपण ज्या संकल्पना शिकतो, त्याचा आपल्या जीवनात कसा उपयोग करू शकतो याचा सतत विचार केला पाहिजे. संकल्पना स्पष्ट होण्यासाठी पुस्तकं वाचावे, इथे दिलेले व्हिडीओ पाहावे, शंका आल्यास मित्रांना विचाराव्या. शिक्षकांशी संवाद साधावा. कृतीमध्ये पंचेन्द्रियांचा वापर केला आहे. कृती केल्यामुळे विद्यार्थी केवळ परीक्षेसाठी तयार न होता जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकतील या उद्देशाने हे शैक्षणिक साहित्य तयार केले आहे.
आपण सर्वांनी या साहित्याचा जास्तीत जास्त वापर करावा. आपल्या जवळच्या शाळांना, मित्रांना याबद्दल सांगावे.

आम्ही आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहोत.!

धन्यवाद!! **